Sukhoi Su 30 crash in assam : सुखोई विमान कोसळले, नागपूरच्या वैमानिकाने गमावले प्राण

air-force-pilot-purvesh-durugkar-from-nagpur-killed-in-sukhoi-su-30-crash-in-assam : भंडारा जिल्ह्यातील शहापूरच्या डीएसए अकादमीत घेतले होते प्रशिक्षण

Nagpur भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानाच्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी पुर्वेश दुरुगकर हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पुर्वेशने भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे डीएसए अकदामीत शिक्षण घेतले होते.

भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळून दोघा वैमानिकांना प्राण गमवावे लागले. गुरुवारी सायंकाळी आसामच्या कार्बी आंगलाँग जिल्ह्यावरून उड्डाण करत असताना विमान रडारवरून गायब झाले होते. संपर्क तुटलेल्या विमानाचा शोध सुरु असतानाच ते कोसळल्याच्या वृत्ताला वायुसेनेने दुजोरा दिला.

यापैकी एक सुखोई एसयू-३० एमकेआय लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळल्याचे भारतीय हवाई दलाने शुक्रवारी स्पष्ट केले. हवाई दलाच्या ‘एसयू-३० एमकेआय’ विमानाने आसाममधील जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केले होते आणि शेवटचा संपर्क रात्री ७.४२ वाजता झाला होता असे संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी एका निवेदनात म्हटले होते.

Maharashtra State Budget 2026 : फडणवीस ठरतील अर्थसंकल्प मांडणारे पहिले मुख्यमंत्री

बोकाजन उपविभागातील चोकीहोला परिसरातील काही स्थानिकांनी एक विमान जंगल भागात कोसळल्याचा दावा केला होता. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी गंभीर दुखापतीमुळे दोन्ही वैमानिकांनी अखेरचा श्वास घेतल्याचे बोलले जाते. मृत वैमानिकांमध्ये स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पुर्वेश दुरगकर यांचा समावेश असल्याचं हवाई दलाने सांगितले.

Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा पोचल्या महाराष्ट्रात!

एक्स सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अधिकृत निवेदनात वायू दलाने शोक व्यक्त केला आहे. एअर फोर्सचे सर्व कर्मचारी या दुःखाच्या प्रसंगात शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत, असेही त्यात म्हटले आहे. हे विमान डोंगराळ भागावरून उड्डाण करीत होते. त्यानंतर त्याचा यंत्रणेशी संपर्क तुटला होता. हवाई दलाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. मात्र दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही.