व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunetra pawar : सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !

ashok-kharat-rupali-chakankar-sunetra-pawar-threat-sit-complaint-beed : अशोक खरात प्रकरणाला नवा ट्विस्ट; एसआयटी कडे तक्रार दाखल

Mumbai: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली असून, या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील तक्रारदाराने थेट एसआयटीकडे धाव घेत ही बाब मांडली आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित विविध धागेदोरे तपासले जात असताना, या नव्या तक्रारीने तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची केली आहे. तक्रारीमागील तथ्य काय आहे आणि यात राजकीय हेतू कितपत आहे, याचा सखोल तपास आता एसआयटीमार्फत केला जाणार असल्याचे समजते. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा आकस किंवा दबाव आहे का, याचाही तपास पोलीस प्रशासनाकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांच्या ‘मेगा भरती’ने जोरगेवार हादरले; कार्यकर्त्यांचा थेट निशाणा!

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांसह इतर पीडितांसाठी SIT ने हेल्पलाईन सुरू केली असून, या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या तक्रारींमध्ये आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषण तसेच कौटुंबिक वादाशी संबंधित बाबींचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व तक्रारींची सत्यता पडताळणे हे एसआयटी समोर मोठे आव्हान ठरत आहे.

Water works : निधीअभावी पाणीपुरवठा योजना रखडल्या; बुलढाण्यात ३०० कोटींची देयके थकीत

दुसरीकडे, इतरांचे भविष्य सांगणारा अशोक खरात स्वतःच्या भवितव्याबाबत मात्र अनिश्चिततेत असल्याचे चित्र समोर आले आहे. चौकशीदरम्यान “मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. खरातविरोधात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले असून, सध्या त्याची विविध प्रकरणांमध्ये कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने फसवणुकीचे काही आरोप मान्य केल्याचेही समजते. धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक यांसारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!