dr-sunil-kayande-demands-demands-fair-probe-chikhala-kakad-case : डॉ. सुनील कांयदे यांची मागणी, शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचा प्रश्नच नाही
Deulgao raja चिखला-काकड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून सत्य जनतेसमोर मांडावे, तसेच या प्रकरणात निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी डॉ. सुनील कांयदे यांनी केली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना त्यांनी असा आरोप केला की, ज्या व्यक्तींचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही, त्यांनाही विनाकारण या चौकशीत गोवले जात आहे. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत असल्याचे चित्र दिसत असून, अशा प्रकारे वातावरण तापवून समाजात तणाव निर्माण करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Governor Acharya Devavrat : समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार, तर विदर्भ होणार ‘स्टील हब’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विरोध केल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना डॉ. कांयदे म्हणाले की, शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. जर खरोखरच असा विरोध झाला असता, तर आम्ही स्वतः त्याविरोधात सर्वात आधी उभे राहिलो असतो.
आम्ही शिवरायांच्या विचारांचे वारसदार असून कायद्याच्या चौकटीत राहूनच आपली भूमिका मांडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्मारकाच्या मुद्द्यावरून समाजात दिशाभूल केली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ सुरू? ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला
या प्रकरणातील प्रत्यक्ष दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मताशी आपण सहमत असल्याचे सांगतानाच, डॉ. कांयदे यांनी निरपराधांना न्याय देण्याची मागणी केली आहे. जर निष्पाप नागरिकांवर अन्यायकारक कारवाई सुरूच राहिली, तर लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
BMC meeting : बीएमसीच्या पहिल्याच बैठकीत येणार नामांतराचे २० प्रस्ताव
प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केवळ ठोस पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावेत आणि प्रकरणातील सत्य पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिखला-काकड प्रकरणी वाढत्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. कांयदे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात आता नवी चर्चा सुरू झाली आहे.








