Breaking

Sunil Tatkare : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना मिळाला थांबा

 

MP Sunil Tatkare flagged off the Indore Express : इंदोर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून खासदार सुनील तटकरे यांनी केला शुभारंभ

Raigad : जलद व अतिजलद दहा गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज इंदोर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.

रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती. आजपासून रोहा येथे कोचुवेली – इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर – हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली – चंढीगड एक्स्प्रेस, दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव एक्स्प्रेस या दहा जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्‍या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला.

Amit Shah : मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेबाबत अमित शाह सकारात्मक !

कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद
जनतेची कामे करताना मन, संवेदना असावी लागते. कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लांब पल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्या, यासाठी प्रयत्न होता आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते सत्यात उतरले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले.

Amgaon Police : आमगाव पोलिसांनी रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले

रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या येथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील, यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही सुनील तटकरे यांनी दिले.

रेल्वे स्थानकाचे आधुनिक नूतनीकरण करताना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरण होणारच आहे. शिवाय स्थानकाचे अंतर्गत सुशोभीकरण होणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहेकरांच्या भवितव्याला याचा उपयोग होणार आहे, असेही तटकरे म्हणाले.

रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्यांची सुरूवात होत आहेत, हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे असे उद्गार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काढले. २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे लवकरच सुशोभीकरण होणार आहे. सुविधा उपलब्ध होत आहेत. याचे कारण आपल्या हक्काचा खासदार सुनील तटकरे यांच्या रुपाने मिळाला आहे, असेही अदिती तटकरे म्हणाल्या.

‘Take off’ from Amravati to Mumbai soon : अमरावतीतून मुंबईसाठी लवकरच होणार ‘टेक ऑफ’ !

यावेळी कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस (२०९३१) या अतिजलद गाडीला हिरवा झेंडा दाखवून खासदार सुनील तटकरे यांनी शुभारंभ केला. पहिली अतिजलद रेल्वे रोहा येथे आज थांबली. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.