व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunil tatkare : अशोक खरातला फाशी द्या; जलदगती न्यायालयात खटला चालवा सुनील...

Sunil tatkare : अशोक खरातला फाशी द्या; जलदगती न्यायालयात खटला चालवा सुनील तटकरेंची मागणी !

sunil-tatkare-demand-death-penalty-ashok-kharat-case : सखोल चौकशी सुरू, आर्थिक घोटाळ्याचे नवे धागेदोरे समोर

Mumbai : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी अशोक खरात याला विकृत प्रवृत्तीचा ठरवत अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. तपासात जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

Satara zp election : ‘त्या’ महिलेला १० कोटीं दिल्याचा शशिकांत शिंदेंचा गंभीर दावा !

 

दरम्यान, तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सिन्नर तालुक्यातील एका पतसंस्थेत अशोक खरातने तब्बल ३२ वेगवेगळी खाती उघडून मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमध्ये सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे ही सर्व खाती विविध व्यक्तींच्या नावावर असली तरी त्यांचे संचालन स्वतः अशोक खरात करत असल्याची कबुली संबंधित संस्थेच्या व्यवस्थापकाने दिली आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, २०२४ मध्ये या सर्व खात्यांमधील रक्कम काढून घेण्यात आली होती. त्यामुळे या व्यवहारामागील उद्देश, पैशांचा स्रोत आणि त्याचा वापर याबाबत तपास यंत्रणा अधिक सखोल चौकशी करत आहेत.

Mva crisis : महाविकास आघाडीत फूट? राजकारणात खळबळ !

याशिवाय, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी धार्मिक स्थळी प्रार्थना केल्याचेही सांगितले. तसेच अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत समाधान नसल्याचे नमूद करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत असून, सामाजिक आणि राजकीय स्तरावर या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत.

___

error: Content is protected !!