Breaking

Swachh Bharat Mission : भर पावसाळ्यात गावांच्या स्वच्छतेची परीक्षा; सरकारच्या अभियानाचे ‘टायमिंग’ चुकले?

Inspection of cleanliness in villages will be conducted during the monsoon season : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५’मध्ये त्रयस्थ पथकाकडून होणार पाहणी

Nagpur आजही खेड्यापाड्यांमध्ये पक्के रस्ते नाहीत. अनेक गावांमधील सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था अद्ययावत नाही. पाणंद रस्त्यांची योजना आजही कित्येक गावांपर्यंत पोहोचलेलीच नाही. त्यातही पावसाळ्यात गावांचे होणारे हाल लपलेले नाहीत. एका मोठ्या पावसात गावंच्या गावं पाण्याखाली येतात. अश्या परिस्थितीत स्वच्छ भारत मिशनच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५’ या उपक्रमांतर्गत गावांमधील स्वच्छतेची पाहणी होणार आहे. त्यामुळे सरकारचे टायमिंग चुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये केंद्र सरकारच्या त्रयस्थ पथकाकडून स्वच्छताविषयक तपासणी व स्वच्छता सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. गावांमध्ये स्वच्छतेची स्थिती सुधारावी, उघड्यावर शौचास बसण्याच्या प्रथेला आळा बसावा, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, असा यामागचा उद्देश आहे. पण हा उद्देश समजावून सांगण्यासाठी पावसाळ्याची निवड का केली, हा प्रश्न कायम आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या आमदारांना कानपिचक्या, कमी बोला जास्त काम करा!

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत, गावांमध्ये स्वच्छताविषयक सुविधांची उपलब्धता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींसंदर्भात तपासण्या केल्या जातील. १५ जून ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यात गावांमधील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायती व १,९५५ गावे आहेत. जिल्ह्यातील गावांमध्ये केंद्र सरकारच्या त्रयस्थ पथकाकडून स्वच्छता सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा जीआर आम्ही काढलेला नाही!

गावांमध्ये उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन केंद्रांचा वापर, ग्रामस्थांची बदललेली मानसिकता, शौचालयाचा वापर आणि स्वच्छतेबाबतची सजगता हे तपासणीचे मुख्य केंद्रबिंदू असतील. प्लास्टिक, ओला व सुका कचरा यांचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन याची माहिती घेतील. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर ५० लाख, २५ लाख, १० लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.