Teacher’s constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंख्येत चार हजारांवर घट

Amravati Division Sees a Decline of Over 4,000 Voters : ६ नोव्हेंबरला संपली नोंदणी, २५ नोव्हेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची मुदत गुरुवार, ६ नोव्हेंबरला संपली असून, यावेळी एकूण ३१ हजार ५१३ शिक्षक मतदारांची नोंद झाली आहे. सन २०२० मधील निवडणुकीत ही संख्या ३५ हजार ६२२ होती. त्यामुळे यंदा ४,१०९ मतदारांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील आक्षेप व हरकती १० डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील. अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

Buldhana Police : १६३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांना आयकर विभागाच्या नोटीस!

नोंदणीची मुदत संपली असली तरी, इच्छुक शिक्षकांना पुढील काळात नावनोंदणी करता येणार आहे; तथापि, ही नावे पुरवणी यादीत समाविष्ट केली जातील. विभागातील सर्व पाच जिल्ह्यांत यंदा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध होती. विशेष म्हणजे, ६ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी ११,४७९ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी बुलढाणा जिल्ह्यातून फक्त तीन अर्ज ऑनलाइन आले आहेत.

Buldhana Police : १६३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांना आयकर विभागाच्या नोटीस!

२०२० व २०२५ मधील तुलनात्मक मतदारसंख्या

जिल्हा २०२० मधील मतदारसंख्या २०२५ मधील मतदारसंख्या

अमरावती 10,386. … 8,200
अकोला 6,480 …….5,042
बुलढाणा 7,484 ……8,919
वाशिम 3,813 ……..3,110
यवतमाळ 7,459……. 6,242
एकूण 35,622 …….31,513