व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tension in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर, पाच...

Tension in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद

Internet service shut down in Manipur amid tensions : बिष्णुपूर जिल्ह्यात विशिष्ट गटाकडून क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ला, दोघांचा मृत्यू

New delhi मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात विशिष्ट गटाकडून क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणात नागरीक रस्त्यावर उतरले.

महत्त्वाचे म्हणजे यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात काही आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. त्यानंतर या परिसरातील तणाव आणखी वाढला. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता, बिष्णुपूरसह इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी भागात रात्री सुमारे एक वाजता एका घरावर स्फोटकं फेकण्यात आली. या स्फोटात पाच वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर त्यांची आई या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.

Buldhana Politics : १५० कोटींच्या कामांवरून महायुतीत कलगीतुरा; भाजप-सेनेत आरोपांच्या फैरी

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सकाळी नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी संतप्त जमावाने पोलीस चौक्यांवर हल्ला केला. तसेच पेट्रोल पंपावरील दोन तेल टँकर, एक मालवाहू वाहन आणि इतर वाहनांनाही आग लावण्यात आली. तणाव वाढताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले.

Farmers Protest : मोर्चेकरी अर्धनग्न पोहोचले सरकारी कार्यालयात, ‘डफडे’ आंदोलन

महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा प्रकार “अमानुष कृत्य” आणि “मानवतेवरील थेट हल्ला” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच हा हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

error: Content is protected !!