Thackeray brand : राज आणि मी एकत्र राहण्यासाठीच एक झालो आहोत !

Uddhav Thackeray’s strong attack at Dussehra gathering : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Mumbai : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना राज ठाकरेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं. “राज ठाकरे आणि मी एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडतोय, पण आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी भाषा आणि मुंबईच्या प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. “मराठीवर हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार नाही. मराठीवर हात लावून दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिले ‘ईरई’च्या सर्वेक्षणाचे निर्देश !

भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “कमळ फुलवण्यासाठी भाजपने सगळीकडे चिखल करून ठेवला. कायद्यांचा गैरवापर करून देशभक्तांना तुरुंगात टाकलं. सोनम वांगचूक पाकिस्तान परिषदेत गेले म्हणून देशद्रोही ठरले, मग गुपचूप पाकिस्तानात केक खाणारे मोदी कोण?”

मणिपूर प्रश्नावर ते म्हणाले, “तीन वर्षे मणिपूर जळत होतं, पण मोदी गेले नाहीत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत नाही, पण बिहार निवडणुकीत महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये टाकले.”

हिंदुत्वाबाबत भाजपवर हल्ला चढवत त्यांनी सांगितलं, “हिंदुत्वाच्या नावावर अंगावर येऊ नका, नाहीतर भाजपचे टोप्या घातलेले फोटो बाहेर काढू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावं.” आसाममध्ये भाजप सरकार असूनही गोमांस खाल्लं जातं, मग खरं धोरण ठरवा असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघाच्या शताब्दी वर्षावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं, “संघाला १०० वर्षे झाली आणि आज गांधी जयंती आहे, हा काही योगायोग नाही.” शिवसेनेतील फुटीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. “शिवसेना फोडली, पण त्यांनी पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. वाघाचे कातडे पांघरलेलं गाढव आता दिसतंय, पण शेवटी गाढव ते गाढवच,” अशी टीका त्यांनी केली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिले ‘ईरई’च्या सर्वेक्षणाचे निर्देश !

शेवटी त्यांनी आवाहन केलं की, “भाजप पगारी मतदार उभे करत आहे. आपण पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार, हे ठरवा.” उद्धव ठाकरेंच्या या भाषणामुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आणखी बळकट झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.