Breaking

Threat to Naib Tehsildar : बच्चू कडू यांच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Case registered against former office bearer of Bachchu Kadu : गाडी व तहसील कार्यालय पेटवून देण्याची दिली होती धमकी

Akola पातूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना धमकावण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध पातूर पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी ११ ते १२.३० दरम्यान घडला.

प्राप्त माहितीनुसार, आसोला येथील सचिन निमकाळे याच्यावर ७ एप्रिल रोजी अवैध मुरूम वाहतुकीप्रकरणी महसूल प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर तो सोमवारी दोन-तीन साथीदारांसह पातूर तहसील कार्यालयात पोहोचला आणि थेट नायब तहसीलदार चव्हाण यांच्या दालनात शिरला. यावेळी त्यांनी शासकीय वाहन चालकाबाबत चौकशी करण्याचे कारण देत वातावरण तापवले.

Vidarbha Farmers : चिखली तालुक्यात पीक विमा भरपाईचा खोळंबा; १६ कोटी रुपये अजूनही प्रलंबित

चव्हाण यांच्यासमोरच त्याच्या साथीदाराने मोबाइल फोन देत सांगितले की, ‘फोनवर अरविंद पाटील बोलणार आहेत’. फोन स्पीकरवर ठेवून अरविंद पाटील यांनी चव्हाण यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि “तो चालक पुन्हा गाडीत दिसला, तर कमरेत लाथा घालतो, गाडी व तहसील कार्यालय पेटवून देतो,” अशी धमकी दिली.

या घटनेदरम्यान चव्हाण व तहसीलदार यांच्याबाबतही अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली असून, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरही ती टाकण्यात आली. यामुळे नायब तहसीलदार चव्हाण यांची सामाजिक व प्रशासकीय बदनामी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Ajit Pawar : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणू, नातेवाईकांनी घाबरू नये !

चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीसोबत संबंधित ऑडिओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेज यांचा समावेश असलेली पेन ड्राईव्ह पुराव्यादाखल सादर केली आहे. त्यांनी अरविंद पाटील (रा. टाकळी खोजवळ, ता. बाळापूर), सचिन निमकाळे (रा. आसोला) व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.