Anjali Damania got angry on Ajit Pawar : अजित पवारांवर, अंजली दमानिया चांगल्याच भडकल्या
Mumbai : करमाळा तालुक्यातील कुर्डू गावात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यावरून मोठा वाद पेटला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत पवारांनी संबंधित महिला अधिकार्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
कुर्डू गावात अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार आणि तलाठी कारवाईसाठी पोहोचले होते. मात्र, त्यावेळी काही स्थानिकांनी काठ्या घेऊन अधिकाऱ्यांना धमकावले. त्यानंतर आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी उत्खनन करणाऱ्यांनी अजित पवारांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. कार्यकर्त्यांनी कॉल स्पीकरवर टाकत तो अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले.
Adivasi Pardhi Family : आदिवासी पारधी कुटुंबावर सावकाराचा हल्ला, महिला गंभीर !
या संवादात अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना “तुमचं डेरिंग कसं झालं?” असा प्रश्न विचारत, कारवाई करु नका, अन्यथा तुमच्यावरच कारवाई करेन, असा इशारा दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या, एक अधिकारी आपलं काम प्रामाणिकपणे करत होता, तर त्यांना फोनवरून धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजित पवारांनी नीट माहिती घेतली का? इतकी दादागिरी कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “त्या महिला अधिकार्यांची अजित पवारांनी तात्काळ माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली.या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, उपमुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी हल्ला चढवला आहे.








