Breaking

Transfers of IAS officers : अकोला, बुलढाण्याला मिळाले नवीन पोलीस अधिक्षक!

Akola, Buldhana get new Superintendent of Police : बदलीचा धडाका, दोन्ही अधिकाऱ्यांची नागपूर, अमरावतीमध्ये बदली

Akola अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची प्रशासनिक कारणास्तव बदली करण्यात आली आहे. या बदल्यानुसार दोन्ही जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. नागपूर, अमरावती येथील पोलिस अधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने हा निर्णय नुकताच जाहीर केला.

अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांची नियुक्ती नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकपदी (Commandant, SRPF) करण्यात आली आहे. बच्चन सिंग यांनी अकोल्यामध्ये गेल्या काही काळात गुन्हेगारीविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांच्या जागी नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांकडून मदतीचा हात अन् सुरेखा शिंदे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या!

अर्चित चांडक हे एक कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. नागपूरमध्ये गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना केल्या होत्या. आता अकोल्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती अमरावती येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या समादेशकपदी झाली आहे. पानसरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि पोलीस वसाहतींच्या सुधारणा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते.

बुलढाण्याच्या पोलिस अधीक्षकपदी आता नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांची बदली करून नियुक्ती करण्यात आली आहे. तांबे यांचा गुन्हे तपासातील अनुभव आणि नेतृत्वगुण पाहता, त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NMC Election : दोन्ही राष्ट्रवादी जागावाटपात फ्रंट फुटवर!

या बदल्यांमुळे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पोलिस प्रशासनामध्ये नवे नेतृत्व मिळाले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.