Wherever Eknath Shinde went, there was criticism : एकनाथ शिंदे शेतीत गेले तरी टिका अन् काश्मीरला गेले तरीही..
Nagpur : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही गेले तरी त्यांच्यावर टिका होते. ते त्यांच्या दरे या गावी शेतीत गेले तरी आणि आता काश्मीरला गेले तरीही विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली. पण ज्यांचं अस्तित्व आम्ही संपवून टाकलं, त्या लोकांच्या टिकेकडे काय लक्ष द्यायचं, असा प्रश्न करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उबाठाला लक्ष्य केले.
नागपुरात आज (२७ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात दुखवटा पाळला जात आहे. अशा परिस्थितीत काही लोक लंडनला सुट्या घालवण्यासाठी गेले आहेत. सर्वपक्षीय बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली. पण आम्ही टिका केली नाही, हा आमचा मोठेपणा आहे.
Illegal sand smuggling: महसूल मंत्र्यांना व्हिडिओ कॉल, आमदारांनी live दाखविले अवैध रेतीसाठे!
भास्कर जाधव अजित पवारांसोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. याबद्दल विचारले असता, ते आमच्या जिल्ह्यातील आमदार आहेत. म्हणून संभाजी महाराजांच्या स्मारकाची आखणी कशी आहे, हे बघण्यासाठी आले होते. पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. याकडे राजकीय दृष्टीने बघण्याची काहीही आवश्यकता नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.
Unfulfilled dream of Dasarwar : दासरवारांचं अपूर्ण स्वप्न मुनगंटीवारांनी केलं पूर्ण !
महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक जगभरात..
संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य आणि त्यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, याबद्दल विचारले असता, पोलिसांबद्दल असं वक्तव्य करणे चुकीचेच आहे. कुणीही अशा प्रकारे बोलू नये, ही आमची भूमिका आहे. वैयक्तिक गोष्टींसाठी आमदार गायकवाड बोलले असतीलही. पण जाणीव झाल्यावर त्यांनी माफीदेखील मागितली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा जगभरात लौकिक आहे, असे ते म्हणाले.