Shiv Sena staged a protest over the desecration of Meenatai Thackeray’s statue : राज्यपालांना निवेदन, महायुती सरकारवर कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप
Buldhana दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आंदोलन छेडण्यात आले. जयस्तंभ चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
शिवसैनिकांनी मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा व स्त्रीशक्तीचा सन्मान जपण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना शिवसेना प्रवक्ता अॅड. जयश्री शेळके म्हणाल्या की, “मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अपमान आहे. दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.”
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविले. निवेदनात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेनेने स्पष्ट केले की, “महा-यूती सरकारच्या द्वेषमूलक राजकारणामुळे व कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे आज राज्यात माणसेच नव्हे तर पुतळेदेखील असुरक्षित झाले आहेत.”
local body elections : काँग्रेसने नेमले प्रभागनिहाय निरीक्षक, अनेकांचा प्रवेश
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इतवारे, जिल्हा समन्वयक डी.एस. लहाने, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अशोक गव्हाणे, विधानसभा सहसंपर्कप्रमुख अनिल नरोटे, शहरप्रमुख नारायण हेलगे, जिल्हा संघटक सुमित सरदार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया खडसान यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला.