Breaking

Uddhav Balasaheb Thackeray : बुलढाण्यात ठाकरे गटाला ‘अच्छे दिन’?

Panchayat Samiti members, Sarpanchs join Uddhav Sena : पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह शेकडोंचा उद्धव सेनेत प्रवेश

Buldhana विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बुलढाण्यात ‘अच्छे दिन’ येत असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेला बुलढाण्यात नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील राजकारणाला नवसंजीवनी देत प्रा. डी. एस. लहाने यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले.

MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लहाने हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सामाजिक कामांमुळे ओळखले जात असून, त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाले. प्रवेशकर्त्यांमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू शेठ, समाधान जाधव, धोंडोबा गायकवाड, प्रमोद कळस्कर, श्रीकृष्ण मापारी, मनोज वानखेडे यांच्यासह चार पंचायत समिती सदस्य, अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि बाजार समितीचे माजी संचालक निंबाजी काळवाघे यांचा समावेश आहे.

Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

या प्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार सिद्धार्थ खरात यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी प्रा. लहाने यांच्या कार्याची स्तुती करत नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे जाळे अधिक बळकट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Harshwardhan Sapkal : मनसेनंतर काँग्रेसही पोहोचले मीरा भाईंदरमध्ये, चर्चासत्र घेणार!

राजकीयदृष्ट्या या प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.