Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाला बसणार धक्का? माजी आमदार दगडू सकपाळ शिंदेंना भेटले

Shinde-led Shiv Sena likely to dent Thackeray camp : पक्षापासून गेले होते दूर, पेडणेकरांच्या उमेदवारीमुळे नाराजी

Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून उद्धव ठाकरे गटाला संभाव्य धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दगडू सकपाळ हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते पक्षापासून दूर असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नवे समीकरण तयार झाले आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांनी गुजराती शाकाहारी ब्रँड प्यायली आहे

या भेटीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सकपाळ यांनी शिंदे यांची भेट घेणे हे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. कारण शिंदे गटाने गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला खेचले आहे. त्यामुळे सकपाळ संभाव्य प्रवेश हा उद्धव गटाच्या संघटनशक्तीवर परिणाम करणारा ठरू शकतो.

सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ प्रभाग क्रमांक २०३ मधून उमेदवारीसाठी इच्छुक होती. पण भारती पेडणेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिल्यामुळे दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. आता या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.