Breaking

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena : उड्डाणपुलाचे बांधकाम थर्डक्लास, शिवसेना आक्रमक!

Allegations that the construction of the flyover is third-class : रस्ता व रेल्वे रोको आंदोलनातून नोंदविला निषेध

Akola शहरातील न्यू तापडिया नगर निर्माणाधिन उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट, थर्डक्लास पध्दतीने व संथगतीने करण्यात येत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली. या दर्जाहीन कामकाजाचा व प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने रस्ता व रेल्वे रोको आंदोलन करत निषेध नोंदविला आहे.

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पध्दतीने व संथगतीने सुरू आहे. प्रशासनाला वारंवार चर्चा, माहिती देऊन सुद्धा उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास जात नसल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात शिव/सेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा, पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात न्यू तापडिया नगर रेल्वे क्रॉसिंग येथे रस्ता व रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

Harshwardhan Sapkal : अचानक युद्धबंदी जाहीर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण?

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे बांधकाम उत्कृष्ट पध्दतीने व तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. यावेळी. शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात ये – जा करणाऱ्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास न्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

Devendra Fadnavis : निविष्ठा विक्रीत लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल होतील

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, शहर प्रमुख राहुल कराळे, राजेश मिश्रा, शिवा मोहोड, ज्ञानेश्वर गावंडे,युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर,तरुण बगेरे, उपजिल्हाप्रमुख विशाल घरडे उपस्थित होते.