Bajoria’s big statement on mutual party affiliations in Shinde Sena : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेत येऊन काय मिळणार?
Akola उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. काही पक्ष प्रवेश परस्पर होत असले तरी सर्वांचे स्वागत आहे. संबंधितांना पक्षात जबाबदारी देण्याचा निर्णय स्थानिक सहा जणांची कमिटी घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी सोमवारी १३ जानेवारीला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक विजय, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे यांच्यासह रेखा राऊत, गजानन बोराळे यांनी नुकताच मुंबइ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
National Youth Day : १०८ सामूहिक सूर्यनमस्कारांनी भारावली शेगावनगरी!
यंदा महापालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदिने लढणार असून, शहरातील २० प्रभागांचा लेखाजोखा तयार आहे. जागा वाटपावेळी आमचा वाटा मागून घेऊ. यासंदर्भात दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले.
म्हणून सोडला पक्ष
पक्ष वाढीसाठी काम करु देत नव्हते. घुसमट होत असल्यामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे विजय दुतोंडे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, विठ्ठल सरप, रमेश गायकवाड, उषा विरक, देवश्री ठाकरे, रेखा राऊत, गजानन बोराळे, अतुल येळणे आदी उपस्थित होते.
ACB arrest : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली एक हजार रुपयांची लाच
जिल्हाप्रमुख नाराज
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी पक्षात परस्पर होत असलेल्या प्रवेश याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पक्षामध्ये प्रवेश देताना विश्वासात घेतले जात नसल्याचा व त्याचा परिणाम पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पिंजरकर यांनी म्हटले आहे.
कसे सांभाळून घेणार?
सत्ता असले की त्या पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ अधिक असतो. अशा परिस्थितीत सर्वांनाच कसे सामावून घेणार, असा प्रश्न पडतो. आधीच सर्व पदांवर नियुक्ती झाली असताना नवीन लोकांना कसे सामावून घेणार, असा प्रश्न पक्षातील पदाधिकारीच विचारू लागले आहेत