thackeray-shivsena-leader-to-join-congress-in-buldhana : मुंबईत लवकरच प्रवेश होणार, ठाकरेंच्या जिल्हा नेतृत्वाला मरगळ आल्याची चर्चा
Buldhana जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसमध्ये गळती सुरू असल्याच्या चर्चांदरम्यान, काँग्रेसनेच उद्धवसेनेतील एका स्थानिक नेत्याला आपल्या गळाला लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संबंधित नेता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह लवकरच मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात सध्या उद्धवसेनेत संघटनात्मक मरगळ जाणवत असल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्याशिवाय इतर नेते फारसे सक्रिय नसल्याची चर्चा असून, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हेही सार्वजनिक कार्यक्रमांत क्वचितच दिसतात. या पार्श्वभूमीवरच पक्षातील एक प्रभावी नेता काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर
सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
Chandrapur Municipal Corporation : उद्धव ठाकरे म्हणतात, चंद्रपूरच्या युतीला माझी हरकत नाही
उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसची नाराजी ओढावून घेतली होती. आता काँग्रेसनेच उद्धवसेनेतील नेत्याला गळाला लावल्याची चर्चा रंगत असल्याने, आगामी राजकारणात नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








