Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेची कारवाईची मागणी

objectionable statement on uddhav thackeray on social media video : सोशल मीडियावरून धमकी प्रकरण तापले; व्हिडीओ झाला व्हायरल

Mehkar शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन २८ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर तसेच ठाणेदार यांना देण्यात आले.

निवेदनानुसार, २२ मार्च रोजी दुपारनंतर एका व्यक्तीने सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम) प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये पक्षप्रमुखांविषयी निंदाजनक वक्तव्य करत आमदार सिद्धार्थ खरात यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह भाषा वापरत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Banner controversy : बॅनर वादाने राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ; रोहित पवारांचा तीव्र निशाणा !

या प्रकारामुळे सामाजिक आणि राजकीय तेढ वाढण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे गंभीर प्रकरण असल्याचे शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा आमदारांच्या सुरक्षेबाबत काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावेळी उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाभाऊ पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा शहरप्रमुख आकाश घोडे, तालुका समन्वयक संजय वडकर, नगरसेवक महेश रिंढे, नितीन तुपे, निसार अन्सारी, एडवोकेट संदीप गवई, डॉ. शेषराव बदर, साहेबराव हिवाळे, दत्तात्रय घनवट, परमेश्वर दहातोंडे, पंडित बापू देशमुख, अमोल बोरे, राजेक अली, सनी सांगळे,गोपाल गायकवाड, अमोल मोरे, विकास शिंदे,शुभम पानखेडे,विलास शिंदे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

kerosene sale : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

दरम्यान, वाढत्या सोशल मीडिया वापरामुळे राजकीय व्यक्तींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्ये आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.