udhaav thackeray shivsena geared up for zilla parishad election : बैठकीतून पक्ष संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य, जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी
Buldhana जिल्ह्यातील राजकीय हालचालींना सध्या चांगलाच वेग आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी संघटन बळकटीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावपातळीपासून तालुकास्तरापर्यंत बैठकांची मालिका, वरिष्ठ नेत्यांचे वाढते दौरे आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद या माध्यमातून “फिल्डिंग लावण्याची” स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.गत काही दिवसांपासून सायलेंट झोनमध्ये गेलेली उद्धव सेना पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये आली आहे.
या घडामोडींमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत उद्धवसेना जिल्ह्यात काहीशी “बॅकफूटवर” गेल्याची चर्चा सुरू होती. इतर पक्षांच्या तुलनेत संघटनात्मक हालचाली तुलनेने कमी दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पातळीवरील बैठका, पदाधिकाऱ्यांचे दौरे आणि नव्या नियुक्त्या यांचा वेग कमी असल्याने विरोधकांकडूनही उद्धवसेनेवर टीका होत होती.
Property tax hike : करवाढीच्या सुनावणीत ‘थकबाकी’चा बॉम्ब; मलकापूर न.प.समोर आर्थिक संकट
मात्र आता हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संघटनात्मक पुनर्बांधणीवर विशेष भर देण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. बूथस्तरापासून तालुकास्तरापर्यंत पदाधिकारी सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच आयोजित आली होती. या बैठकीत पुढील राजकीय रणनीती, संघटन विस्तार, संभाव्य उमेदवारीची चाचपणी आणि आगामी निवडणुकांची पूर्वतयारी यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Water works : निधीअभावी पाणीपुरवठा योजना रखडल्या; बुलढाण्यात ३०० कोटींची देयके थकीत
ही बैठक केवळ नियमित संघटनात्मक आढावा बैठक नसून जिल्ह्यात उद्धवसेना पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीचा स्पष्ट संकेत मानली जात आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील नेटवर्क पुन्हा मजबूत करण्याची रणनीती या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.








