Breaking

Uddhav Thackeray: समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं !

Uddhav Thackerays comments on MVA also targeted Election Commission : उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीवर भाष्य, निवडणूक आयोगावरही साधला निशाणा

Mumbai : लोकसभेत जे कमावलं ते विधानसभेत गमावलं सहा महिन्यातच नेमकं काय झालं या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी संदर्भात मोठे विधान केले. शेवटपर्यंत, तू तू मैं मैं… सुरू राहिलं त्यातून वाईट मेसेज गेला. समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं अशी कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्या वरून निवडणूक आयोगावरही तीव्र टीका केली आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या महा मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे दिली आहेत.

उद्धव ठाकरेंनी मुलाखती दरम्यान लोकसभेचा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ‘तू तू मैं मैं’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला, विधानसभेला उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही, यात समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो ‘मी’पणा आला तेव्हा पराभव आला अशी कबुली उद्धव ठाकरेंनी दिली.

Sudhir Mungantiwar : अरबिंदो कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधीमंडळात ठाम पाठपुरावा

सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळयांवर आता चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलंय. ‘लाडकी बहीण’सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ ‘आपल्याला जिंकायचंय’ म्हणून सोडून दिले, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय निवडणूक आयोगावर त्यांनी हल्लाबोल करत टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी टीका त्यांनी केली. तसंच देश अशांत, अस्थिर ठेवायचा हेच भाजपचं धोरण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय, असंही उद्धव ते म्हणाले. पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर विचारलेले प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे’, असंही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना हा एक विचार होता आणि आहे. शिवसेना हे लोहचुंबक आहे असे बाळासाहेब म्हणायचे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झालाय का या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या पिढ्यान्पिढ्या आजही शिवसेनेसोबत आहेत.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या सिंहगर्जनेने गाजले विधानभवन !

कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठं करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतकं करूनही हे संपत कसे नाहीत? ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले. उद्धव ठाकरे म्हणाली.