Uma-bharati-questions-where-is-ramrajya : रामाची पूजा करणारा प्रत्येक जण काही भाजपचा मतदार नाही, केंद्र सरकारचे वेधले लक्ष
Nagpur अयोध्येत राम मंदिर बांधले म्हणजे सर्व काही संपले असा होत नाही. रामाची पूजा करणार आणि रामाचा फोटो घरी लावणार प्रत्येक व्यक्ती हा काही भाजपचा मतदार नाही. यासाठी पुढचे उद्दिष्ट रामराज्याचे ठेवावे लागणार आहे. हे रामराज्य विषमता नसलेले, जाती व्यवस्था नसलेले असावे, याकडे मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील उद्यानात आयोजित या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. हिंदू राष्ट्र म्हटल्यावर अनेक लोक घाबरतात. त्याची तुलना इस्लामिक राष्ट्राशी करतात. मात्र, हिंदू राष्ट्र हे सर्वसमावेशक आहे. सर्वांचा सन्मान न झाल्यास ते हिंदू राष्ट्र होणार नाही, असेही उमा भारती यांनी नमूद केले.
Nitin Gadkari : नगरसेवकाने काम केलेच पाहिजे, पण तो तुमचा पाळीव प्राणी नाही!
कोरोना काळात याच देशात लाखो लोक अनवाणी पायाने रस्त्यांवर चालत होते. तर, काही लोकांचे कुत्रे विमानाने प्रवास करत होते. अशा स्थितीत समरसता कशी राहणार. ज्या दिवशी शासकीय शाळा, रुग्णालये यांची स्थिती खासगी शाळा, रुग्णालये यासारखी होईल, त्या दिवशी सामाजिक समरसता येईल. त्याच वेळी जगात शांती प्रस्थापित करण्यात नक्कीच भारताचा हात राहील, असेही त्या म्हणाल्या.
आता राम मंदिराचे निर्माण झाले. पुढचे उद्दिष्ट रामराज्याचे आहे. हे रामराज्य विषमता नसलेले, जाती व्यवस्था नसलेले रामराज्य असणार आहे. आता देशात आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची व्यवस्था आहे. आता मनूची व्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अयोध्येमध्ये राममंदिराचे निर्माण कार्य झाले. मात्र, राममंदिर असलेल्या अयोध्येमध्येच भाजपला पराभवाचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे, प्रत्येक राम भक्ताला भाजपाचा भक्त म्हणणे चुकीचे आहे. ऐव्हाना, हा भ्रम जपल्याने ही स्थिती निर्माण झाली. भाजपाचा उदय अलीकडे झाला, भगवान रामाचे फार पूर्वीचे अस्तित्व आहे. भगवान राम आणि हनुमान भाजपचे कार्यकर्ते नाही, असेही उमा भारती यांनी स्पष्ट केले.








