Breaking

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही!’

Union Minister Gadkari made a statement regarding the delay in justice : प्रलंबित प्रकरणांवर केंद्रीय मंत्री गडकरींचं महत्त्वाचं विधान

Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांकडे लक्ष वेधलं. ज्या प्रकरणांचा निकाल अगदी काही दिवसांमध्ये लागू शकतो, ती प्रकरणे अनेक वर्षे का सुरू राहतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी स्वतःच्या संदर्भातही एका प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला. ‘त्या प्रकरणात न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा का दिली नाही आणि निर्दोष का सोडले नाही, हे आजपर्यंत कळले नाही,’ असं गडकरी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारोहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांचीही प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘एबी बर्धन, बिंदा प्रसाद कश्यप, प्रा. जोगेंद्र कवाडे आम्हा सर्वांना एका आंदोलनात अटक झाली. एम्प्रेस मीलच्या संदर्भातील ते आंदोलन होते. आमच्या खूप केसेस तेव्हा कोर्टात जायच्या. आम्ही सकाळी ११ वाजता उभे राहायचो आणि चपराशी चार वाजता आवाज द्यायचा. ‘नितीन वर्सेस स्टेट’ असा आवाज यायचा. मग साहेब तारीख द्यायचे.’

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘समोसेवाल्याची उधारी दिलेली आहे’

न्यायालयाच्या चकरा मारताना आयुष्यातील अनेक दिवस इथला समोसा आणि पाटोडी खाण्यात गेले. पण न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही. असे का केले असावे, हे आजपर्यंत समजले नाही. ज्या प्रकरणाचा दहा मिनिटांत निकाल लागू शकतो, ते प्रकरण तेरा वर्षे का सुरू राहते, हेदेखील आजपर्यंत कळले नाही. त्यामुळे महाविद्यालयातून सर्वसामान्यांना लवकरात लवकर न्याय देणारे विद्यार्थी घडावे, असं गडकरी म्हणाले.

आपले महाविद्यालय मोठे होत असताना विधी प्रक्रियेमध्येदेखील परिवर्तन आले पाहिजे. त्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा होईल, याचा विचार झाला पाहिजे. यामध्ये वेळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामान्य माणसाचा जो न्याय अपेक्षित होता, त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, असं ते म्हणाले.

Akash Fundkar : लहान कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही !

लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे, त्यातील मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वाची आहेत. ही मूल्ये कधीच बदलू शकत नाहीत. संविधानाच्या आधारावरच आपली लोकशाही टिकलेली आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. वेळेत न्याय मिळाला पाहिजे, असे मला कायम वाटत असते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कसे परिवर्तन करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहन गडकरींनी केले.

गडकरी म्हणाले, ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना गुणवत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. विधी महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी उपराष्ट्रपती मो. हिदायतुल्ला, न्यायाधीश मंडळींनी ही गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यादृष्टीने काम करणारी पिढी या महाविद्यालयातून तयार होईल, याचा मला विश्वास आहे.’