President, working president changed before local elections : नागपूर शहर अध्यक्षपदी मंगेश वानखेडे तर कार्याध्यक्षपदी सिद्धांत पाटील
Nagpur नागपूर महानगपपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीने कार्यकारीणीत बदल केला आहे. विशेष म्हणजे तरूण नेतृत्वावर विश्वास ठेवत अध्यक्ष, कार्याध्यक्ष बदलण्यात आले आहेत. मंगेश वानखेडे यांची शहराध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी सिद्धांत पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तरुणतुर्कांवर दाखविलेला विश्वास पक्षाला किती फायदेशीर ठरेल हे निवडणूकीत लक्षात येईलच. मात्र तरुणांची मते डोळ्यासमोर ठेवूनच हे बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने नागपूर शहर कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत नव्या दमाच्या बहुतांश युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शहर अध्यक्षपदी मंगेश वानखेडे तर कार्याध्यक्षपदी सिद्धांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ३८ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये तीन वकील आणि दोन प्राध्यापकांचा समावेश आहे.
Pune Railway station : पुणे रेल्वे स्टेशनला पेशव्यांचे नाव देण्याचा वाद तापला
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचितने संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याअंतर्गतच या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. महाविकासआघाडीसोबत पक्ष जाणार की नाही हे स्पष्ट नसले तरी संघटन बळकटीला सुरुवात झाली आहे. लवकरच शहरातील सर्व प्रभागांच्या नियुक्त्या करून शहरभर पदाधिकाऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे.
Hindi controversy : राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही
गेल्या महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील भारिप बहुजन महासंघाने निवडणूक लढविली होती. त्यांनंतर वंचित बहुजन आघाडी तयार झाली. नागपुरात बसपा व इतर रिपब्लिकन पक्ष असल्याने वंचितसमोर अनेक आव्हाने आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच कष्ट उपसावे लागणार आहेत.