Vande Bharat to stop at Shegao Junction : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचा निर्णय; परिपत्रक जारी
Buldhana नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगाव येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे विभागाने ७ ऑगस्ट रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, १० ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनानंतर ही सुविधा लागू होणार आहे.
शेगावला थांबा मिळावा यासाठी प्रतापराव जाधव यांनी नुकतीच रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केली होती. संत गजानन महाराज संस्थानाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या रेल्वे मंत्र्यांना पटवून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे बोर्डाचे संचालक संजय निलम यांच्या स्वाक्षरीने ७ ऑगस्टला परिपत्रक निर्गमित झाले.
Waqf Board lands : वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील रहिवाशांना पट्टे मिळणार !
नव्या वेळापत्रकानुसार, ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार असून नागपूरहून सकाळी ९.५० वाजता सुटेल, वर्धा, बडनेरा, अकोला मार्गे दुपारी अंदाजे १.२० वाजता शेगावला थांबेल. परतीच्या प्रवासात पुण्याहून दुपारी २.४५ वाजता शेगाव येथे थांबा असेल. नागपूर–पुणे ८८४ कि.मी. चे अंतर ही वंदे भारत अवघ्या १० तासांत पूर्ण करणार आहे.
Teacher recruitment scams : १२ वर्षांतील शिक्षकांच्या नियुक्त्यांची होणार तपासणी !
शेगावचे संत गजानन महाराज संस्थान हे देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पुणे व नागपूर हे दोन्ही महानगर हवाई मार्गाने जोडलेले असल्याने देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना ही रेल्वे मोठी सुविधा ठरणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले की, “मतदारसंघातील नागरिक आणि भाविकांच्या सोयीसाठी शेगावला वंदे भारतचा थांबा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला. हा निर्णय घेतल्याबद्दल मी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानतो.”