‘Bhikh Mango’ agitation to demand loan waiver : ‘भीक मांगो’ आंदोलनातून सरकारला सवाल
Buldhana शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी जाहीरनाम्यांतून करणाऱ्या महायुती सरकारवरच शेतकऱ्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलनातून थेट आर्थिक व राजकीय चिमटा काढला आहे. जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर पार पडलेल्या आंदोलनात, भूमिपुत्र शेतकऱ्यांनी नागरिकांकडून १,२०० रुपये ‘भीक’ स्वरूपात गोळा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले.
पीककर्ज मिळत नाही, विमा मिळत नाही, बाजारभाव घसरतो आणि शासन मात्र ‘केवळ आश्वासने’ देत राहते, असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “वचनपूर्ती न करणारे मुख्यमंत्री आणि मंत्री केवळ निवडणुकीआधीच शेतकऱ्यांना आठवतात का?”, असा प्रश्न शेतकरी आंदोलक तुकाराम पाटील, माजी सरपंच राम वानखडे आणि इतरांनी उपस्थित केला.
Education Department : गैरव्यवहार होत असताना शिक्षण विभाग गप्प का?
शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून ‘भीक मांगो’ आंदोलन करत एकत्रित १,२०० रुपये जमा करून, ते मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले. “हे पैसे आमच्या आत्महत्येच्या आधी वापरा. आम्हाला आधार द्या. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळा,” असा टोला आंदोलकांनी लगावला.
load shedding : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या कार्यालयात धडक
२०२३–२४ च्या पीक विम्यापासून हजारो शेतकरी वंचित आहेत. बियाणे, खते, अवजारे यावर लागू जीएसटी हटवावी. व्यापाऱ्यांना परतावा, पण शेतकऱ्यांना अद्याप दिला नाही. ही दुजाभावाची नीती सरकार अवलंबत आहे. त्यामुळे येत्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. विशाल ताकोते पाटील, कार्तिक राऊत, आकाश उमाळे, रामेश्वर काळे, दीपक आढाव, अशपाक देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती.