Breaking

Vidarbha Farmers : चिखली तालुक्यात पीक विमा भरपाईचा खोळंबा; १६ कोटी रुपये अजूनही प्रलंबित

Crop insurance compensation delayed in Chikhali taluka : शेतकऱ्यांचा संताप, प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी

Buldhana प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात विमा भरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक हानी झाल्यानंतर शासनाने एकूण ३५.७५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र, त्यापैकी केवळ १८.५५ कोटी रुपयेच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित १६.२० कोटी रुपये अजूनही प्रलंबित आहेत.

सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात १९,५५६ शेतकऱ्यांसाठी ९.८४ कोटी तर रब्बी हंगामात २३,८३८ शेतकऱ्यांसाठी २५.९१ कोटी रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली होती. मात्र खरीपसाठी केवळ ५.७५ कोटी (१३,९४३ शेतकरी) आणि रब्बीसाठी १२.८० कोटी (५,१७८ शेतकरी) इतकाच निधी वितरित झाला आहे.

२७ मार्च २०२५ रोजी शासनाने विमा कंपनीला आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीकडून अद्यापही वितरण प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. शासकीय निर्णय असूनही प्रत्यक्ष व्यवहारात ही रक्कम अजूनही बँक खात्यांत पोहोचलेली नाही.

Vidarbha Farmers : निव्वळ घोषणा; कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी!

“शासनाकडून मंजुरी मिळाली, निधीही उपलब्ध आहे, मग आमच्या खात्यात पैसे का नाही आले?” असा थेट सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही नेते केवळ श्रेय लाटण्यात गुंग असल्याचा आरोप होत असून, प्रत्यक्षात मदतीसाठी शेतकरी अजूनही दरवाजे झिजवत आहेत.

Vidarbha Farmers : विमा कंपन्यांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा संताप

शेतकरी संघटनांचा इशारा
या खोळंब्याविरोधात शेतकरी संघटना आंदोलनाची तयारी करत आहेत. त्यांनी विमा कंपनीला लवकरात लवकर NCIP पोर्टलद्वारे संपूर्ण रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा योजनेवरील विश्वासच उडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.