Demand raised to bring back three pro-farmer agricultural laws : दर्यापूर येथे विविध संघटनांच्या कृषी कार्यकर्त्यांचे विचारमंथन
Amravati पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यापूर्वी लागू केलेले व नंतर मागे घेतलेले तीन कृषी सुधारणा कायदे पुन्हा लागू करण्यात यावेत, अशी मागणी आता विविध शेतकरी व सामाजिक संघटनांकडून पुढे येत आहे. दर्यापूर येथील ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते अरविंद नळकांडे ऊर्फ बाबूजी यांच्या नेतृत्वाखाली श्रमराज्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी कार्यकर्त्यांच्या विचारमंथन बैठकीत ही मागणी करण्यात आली. याबाबत संघटितपणे पुढील लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, ही बैठक भारतातील ‘स्वदेशी’ चळवळीचे पहिले हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी पार पडली. याच दिवशी शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून शेतकरी हिताचा नवा विचार मांडला होता, याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले.
Bomb Threat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी
बैठकीत बोलताना वक्त्यांनी सांगितले की, देशाच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कष्टकरी घटकांचा आहे. मात्र, विद्यमान कायदे, व्यवस्थेतील अडचणी आणि आर्थिक अस्थिरतेमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुला बाजार, थेट विक्रीची संधी व उत्पादनाला योग्य दर मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारने तीन कृषी सुधारणा कायदे आणले होते. मात्र, विविध आंदोलनांमुळे हे कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हे कायदे योग्य सुधारणांसह पुन्हा लागू करण्यात यावेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
Prakash Shinde : ‘त्या’ ड्रग्सप्रकरणावरून राजकारण तापलं; प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले
अरविंद नळकांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वनराईचे मधुकर घारड, माजी जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, लोकसंग्राम पक्षाचे दिलीप देशमुख, श्रमराज्यचे प्रदीप इंगळे, भाजपचे माणिकराव मानकर, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संजय आसरे, शीतल ठाकूर, भाकपचे रूपराव तिडके तसेच विविध सामाजिक, राजकीय व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत शेतकरी प्रश्नांवर व्यापक जनजागृती, चर्चा व संघटनात्मक प्रयत्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.








