Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा, किसान ब्रिगेडचा इशारा

Demand to Start Cotton and Soybean Procurement : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन, कापूस-सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी

Malkapur राज्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टी, उत्पादन घट आणि बाजारभावातील घसरणीमुळे संकटात सापडला असताना, शासनाने हमीभावाने कापूस आणि सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरू करावी, अशी ठाम मागणी राष्ट्रीय किसान ब्रिगेडने केली.

या संदर्भात बुलडाणा जिल्हा किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

Vijay Wadetiwar : आधी जरांगे, आता भुजबळ… दोघांनीच मला टार्गेट केलं!

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गत महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेली मदत अजूनही खात्यात जमा झालेली नाही. दरम्यान, व्यापारी वर्गाने बाजारात कापूस व सोयाबीनचे दर घसरवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे.

केंद्र व राज्य शासनाने अद्याप हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. “शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी हमीभावाने खरेदी केंद्रे तातडीने सुरू न करणे म्हणजे व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देणे होय,” असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला.

शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सक्रीय करून बाजारभावांवरील नियंत्रण आणावे, तसेच हमीभाव खरेदी केंद्रे उघडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

Pawars advice : राजकारण करा पण कॉन्ट्रॅक्टर बनू नका !

या निवेदनावर किसान ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वासुदेव पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, संभाजी शिर्के, मनिष विष्णु नारखेडे, सुधाकर नारखेडे, शेख इमरान लकी, हरीदास गणबास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.