Vidarbha Farmers : शेतकरी नेत्यांवरील चुकीचे गुन्हे रद्द करा

Demand to withdraw false cases filed against farmer leaders : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Akola मराठवाडा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे, प्रहार हिंगोली जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे आणि कार्यकर्ते प्रवीण मते यांच्यावर शेनगाव पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला अॅट्रॉसिटीसह कलम 353 चा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटना अकोला जिल्ह्यातर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन संघटनेने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले.

निवेदनात म्हटले आहे की, 26 नोव्हेंबर रोजी संबंधित तिघेही पंचायत समिती कार्यालय, सेनगाव येथे विहीर गोठा, घरकुल आणि इतर शेतकरी विषयक प्रलंबित कामांबाबत माहिती घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्या वेळी कार्यालयातील कर्मचारी अनुपस्थित होते. तसेच दुपारी एक वाजेपर्यंतही संविधान दिनाचा कार्यक्रम किंवा 26/11 शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता.

मतमोजणीला विलंब; १८ दिवस उमेदवारांचा ‘जीव टांगणीला’

ही माहिती त्यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून दिली. त्यावेळी पत्रकारही उपस्थित होते आणि त्यांनी परिस्थितीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. यानंतर संबंधित शेतकरी नेत्यांवर चुकीची फिर्याद देत अॅट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले, जे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Teacher’s Constituency : शिक्षक मतदारसंघात ५,८०६ मतदारांची घट, १८ डिसेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत

संघटनेने म्हटले आहे की, त्या दिवशी गटविकास अधिकारी स्वतः कार्यालयात गैरहजर होते. प्राथमिक चूक त्यांच्या बाजूने असताना शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करणे अयोग्य आहे. त्यामुळे दाखल केलेले सर्व चुकीचे गुन्हे रद्द करावेत, संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करावे, आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनोने, रमेश चिंचे, दिनेश कळम यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.