Farmers’ crops suffer huge losses due to unseasonal rains : गहू, हरभरा पिकांचे नुकसान; वीज पडून जनावरे ठार
Wardha जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले तर काहींची जनावरे ठार झालीत.
अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे काढणीच्या वेळी किंवा पीक परिपक्व होत असताना नुकसान होते. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत, पीक विमा आणि हवामान अंदाजावर आधारित सल्ला यांची गरज असते. शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Dr. Pankaj Bhoyar : वर्धा जिल्ह्यातील ४० तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट!
कानगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात कांदा, टरबूज, खरबूज, रब्बीतील ज्वारी, तीळ, मूग पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतात ठेवलेली वैरणही भिजली. सेलू तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी राजेंद्र लटारे यांनी दीड एकरात पपईची लागवड केली होती.
Nitin Gadkari : सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षे नोकरीची सक्ती हवी
झाडं परिपक्व झाल्यानंतर ऐन तोडणी सुरू करण्याच्या वेळीच अवकाळीचा तडाखा बसला. पपईची झाडे तुटून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पपईची हजारो झाडे फळांसह तुटून पडली. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी लटारे यांनी केली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील खेकडी शिवारात शेतात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. वाघोली शिवारात वीज पडून दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. यावेळी काही अंतरावर असलेल्या पशुपालकाला इजा पोहोचली नाही.