Farmers threw pigeon pea on the road : भाव घसरल्याचा संताप; तूर उत्पादक परिषद
Amravati शहीद शेतकऱ्यांना व दिवंगत शेतकरी नेतृत्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रीक्षेत्र बहिरम येथे तूर उत्पादक शेतकऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. सध्या तुरीच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत तूर रस्त्यावर फेकून आंदोलन केले.
१९७५ साली बहिरम येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. शासनाच्या धोरणांना आव्हान दिले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात विठ्ठलराव दुतोंडे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी जानराव पाटील होते. यावेळी प्रकाश साबळे, सुधाकर हावरे, रामदास भोजने यांसारख्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी तुरीच्या भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचे मत व्यक्त केले.
MLA Siddharth Kharat : काम करायची इच्छा नसेल तर तुमचा मार्ग मोकळा
यावेळी स्व. विठ्ठलराव दुतोंडे, भाऊसाहेब साबळे, दादासाहेब हावरे यांच्यासह दिवंगत शेतकरी नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल भालेराव यांनी केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या या परिषदेने शासनाला संवेदनशील होण्याचा संदेश दिला.
बुलढाण्यात कापूस उत्पादकांचा रोष
दरम्यान, बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीची मागणी केली. त्यामुळे बाजार समिती समोरील देऊळगाव राजा-जालना मार्गावर रस्ता अडवला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनास्थळी हजर राहावे लागले.
महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकासाठी २०० कोटी मंजूर !
शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता, बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, उपसभापती दादाराव खार्डे, आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सांगितले. शनिवार आणि रविवार रोजी केंद्र कापूस खरेदी करत नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.








