Breaking

Vidarbha Farmers : वन अधिकाऱ्यांची शेतकऱ्याला बेदम मारहाण!

Forest officials brutally beat up farmer : जंगलात आग लावल्याचा संशय; काठीने वार केले

Wardha जंगलाला आग लावल्याच्या संशयातून ६५ वर्षीय शेतकऱ्याला शेतातून जंगलात घेऊन जात वनअधिकाऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बोरगाव (गोंडी) शिवारात घडली. नारायण गोमाजी कौरती (६५, रा. बोरगाव गोंडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

नारायण कौरती यांचे बोरगाव (गोंडी) शिवारात सात हेक्टर शेती आहे. शुक्रवारी १४ रोजी होळी सणाच्या दिवशी नारायण कौरती जांबाच्या झाडाखाली आराम करीत होते. दरम्यान, वन विभागाचे आरएफओ अभय ताल्हण त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांसोबत शेतात दाखल झाले. जंगलाला आग लावल्याच्या कारणातून विचारणा करीत त्यातील तिघांनी पकडून ठेवत शेतकऱ्यावर खाली झोपवत अभय ताल्हण यांनी दोन्ही तळपायांवर काठीने मारहाण केली. तसेच पाठीवर, माणेवर, हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

MP Amar Kale : मला संसदेत बोलू देत नाही, माईक बंद करतात

एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्याला वाहनात बसवून धानोलीच्या जंगलात घेऊन गेले. रात्रभर जंगलात फिरवून सकाळी गावात आणून सोडले. नारायण यांच्या शेतात गव्हाचे वाळलेले अभे पीक आहे. असे असताना त्याच्यावरच संशय घेत आरएफओ अभय शरद ताल्हन, अनिल गजानन काळे, गोविंद बाबुराव चंद्रवंशी, दुर्गादास दादाराव अंभोरे यांनी बेदम मारहाण केली.

मारहाण करणारे अधिकारी, कर्मचारी दारू पिऊन असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. शेतकऱ्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करून उचलून नेल्याची घटना गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, एनसीआर दाखल करून विषय तपासात ठेवला होता. घटनेची माहिती भारतीय सेनेत असलेल्या मुलाला मिळाली. त्याने ही बाब त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितली.

Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस!

त्यांनी पोलिस अधीक्षकांना फोन करून घटना सांगितली. अधीक्षकांनी सूचना केल्यानंतर या प्रकरणी खरांगणा पोलिस ठाण्यात आरएफओ अभय शरद ताल्हन, वनकर्मचारी अनिल गजानन काळे, गोविंद बाबुराव चंद्रवंशी, दुर्गादास दादाराव अंभोरे एफआयआर दाखल केला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.