Provide immediate assistance to farmers affected by heavy rains : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी, बांध्यावर जाऊन केली पाहणी
Buldhana चिखली तालुक्यात ९ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने नदी-नाल्यांचे प्रवाह बदलून शेती, घरे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषि सहाय्यक व तलाठी यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेचे नेते रामेश्वर अंभोरे यांनी केली.
अंभोरे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज व दागिने तारण ठेवून पेरणी केली. आता पावसाने पीक व जमिनी दोन्ही उद्ध्वस्त केल्या आहेत.” चिखली तालुक्यात सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पांढरदेव, वरखेड, भोरसा भोरशी, सावंगी गवळी, नायगाव बु, मंगरूळ नवघरे, घानमोड मानमोड, अंबाशी, खैरव आदी गावांमध्ये शेतीसोबत घरे, शाळा, गोठे व वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे.
Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सरकारने केवळ पाहणीपुरते थांबू नये, तर तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी. यासाठी लवकरात लवकर विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
Mandal Yatra : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये हाच हेतू !
या पाहणी दौर्यात रामेश्वर अंभोरे, हेमंत शेजोळ, गणेश शेजोळ, अशोक शेजोळ, नंदूभाऊ पांचाळ, विनोद हांडे, संतोष आकाळ, योगेश आकाळ, नागेश आकाळ, संदीप ढोरे, तलाठी वराडे, कृषि सहाय्यक डुकरे पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.








