Vidarbha Farmers : मुख्यमंत्र्यांना देणार होते आत्महत्याग्रस्त गावातील माती

Soil from suicide-hit village was to be given to the Chief Minister : पोलिसांनी शेतकऱ्यांना घेतले ताब्यात; मूर्तिजापूरमध्येच थांबवले

Akola क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आज, २८ एप्रिल रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर येथे आपल्या विविध मागण्यांसाठी जाणार होते. शेतकरी कर्जमाफी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांमधील माती मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी हे शेतकरी मूर्तिजापूर येथून निघाले होते. मात्र, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गवळी, राहुल वानखडे, सैय्यद रियाज, अरविंद तायडे, शुभम जवजाळ, निलेश गुल्हाने, प्रवीण खोत, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकृष्ण खोत, चेतन ठाकरे, नितीन खेडकर, सोपान तराळ, अमोल डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथळ, रमेश चींचे आणि अरविंद राठोड यांचा समावेश होता. सर्व शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ विविध समस्यांसंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी निघाले होते. सोबत आत्महत्याग्रस्त शेतकरी गावांमधील मातीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सोबत घेतली होती. मात्र प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांना मूर्तिजापूर शहरातच थांबवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

MLA Sajid Khan : दादर नको, सीएसटीपर्यंत जाऊ द्या!

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मागण्या न्याय्य असून, त्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नागपूरला निघाले होते. मात्र त्यांना मधेच अडवून, ताब्यात घेणे हे लोकशाहीच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या दडपशाहीचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पूर्तता न करणाऱ्या सरकारकडून पठाणी वसुली सुरू आहे.

Akola BJP : अकोला भाजपमध्येही फिरणार भाकरी?

त्यामुळे शेतकरी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अडचणीत आला असल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे. या समस्या कडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी त्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांमधील माती भेट देण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळा सोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नागपूरला निघाले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या देऊन घोषणाबाजी केली व सरकारचा दडपशाहीचा निषेध नोंदवला.