Farmers in protest against solar company encroachment: अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष; आंदोलकांची प्रकृती खालावली
Malkapur विवरा–देवधाबा गावजोड रस्त्यावर कल्पा सोलर पॉवर कंपनीने केलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात विवरा येथील शेतकऱ्यांनी २५ जानेवारीपासून मलकापूर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सहावा दिवस उजाडूनही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात शेतकरी व महिलांनी थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच मुक्काम ठोकला आहे.
अन्नत्याग आंदोलनावर बसलेले शेतकरी सीताराम ढोणे यांची प्रकृती खालावली असून, तरीही प्रशासनाकडून कोणतीही वैद्यकीय किंवा प्रशासकीय दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. न्याय मिळावा या अपेक्षेने शांततामय मार्गाने आंदोलन सुरू असताना प्रशासनाची ही भूमिका असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे.
Irregularities in grampanchayat: मोहना बु. ग्रामपंचायतीत घोळच घोळ; अभिलेखांत खोडाखोड व फेरफार
दरम्यान, ३० जानेवारी रोजी शेतकरी कुटुंबातील महिलांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना दालनात प्रवेश नाकारत आंदोलनस्थळीच थांबण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर संतप्त शेतकरी व महिलांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन अधिक तीव्र केले.
या आंदोलनात शेतकरी प्रमोद पाटील, विनोद सरोदे, सुरज चौधरी, भागवत संबारे, बोरले यांच्यासह शेतकरी कुटुंबातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत. “न्याय मिळेपर्यंत उठणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच बसून जेवण करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात मूक निषेध नोंदवला.
दरम्यान, या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. “शेतकऱ्यांवर जिथे जिथे अन्याय होईल, तिथे क्रांतिकारी शेतकरी संघटना ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील,” असे संघटनेचे पदाधिकारी अमोल राऊत व सचिन शिंगोटे यांनी स्पष्ट केले.
Sunetra Pawar DCM Oath : शोकाकुल वातावरणात सुनेत्रा पवार यांची शपथ !
रात्री उशिरापर्यंत महिलांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. सोलर कंपनीच्या अतिक्रमणाबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








