Vidarbha Farmers : कृषी केंद्रांचे गौडबंगाल उघडकीस!

Licenses of 31 agricultural centers cancelled : ३१ केंद्राचे परवाने तातडीने निलंबित, शेतकऱ्यांची सुरू होती फसणूक

Gondia अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने विक्री करणे. परवाना ग्राहकाला परवाना सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे. भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे. परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसताना निविष्ठा विक्री करणे. साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे, बिलावर बॅच नंबर व उत्पादनाची तारीख न लिहिणे यासारखी चालाखी करून शेतकऱ्यांची व सरकारची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांचे गौडबंगाल उघडकीस आले आहे.

कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबवली. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर तातडीने गोंदिया जिल्ह्यातील ३१ कृषी केंद्रांवर ठपका ठेवून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्ह्यातील ३० खतांचे व १ कीटकनाशकाचे असे एकूण ३१ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईने राज्यभरातील कृषी केंद्रांमध्ये धडकी भरली आहे.

Pravin Datke : आमदार प्रवीण दटकेंनी विधानसभेतही पाडली छाप !

जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी, चिखलणी व वाढीच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते. कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करीत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Ambadas Danve : फक्त ८ करारांसाठी दावोसला जायची काय गरज होती ?

शेतकऱ्यांना आवाहन
एमआरपीपेक्षा MRP जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाही करण्यात येईल, असा विश्वास अधिक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी दिला आहे.