Vidarbha Farmers : पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; लोकप्रतिनिधींचे दावे फोल

The farmer received only Rs. 73.69 for crop insurance : शेळगाव आटोळच्या शेतकऱ्याला मिळाले फक्त ७३ रुपये ६९ पैसे

Buldhana अवकाळी पाऊस आणि हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत आहेत. मात्र, प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत मिळालेली भरपाई पाहता विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचे चित्र उघड झाले आहे.

शेळगाव आटोळ येथील भगवान राजाराम आटोळे यांच्या खात्यात विमा भरपाई म्हणून अवघे ७३ रुपये ६९ पैसे जमा झाले. तर प्रमोद इंगळे यांना ११७ रुपये ९० पैसे आणि पांडुरंग देशमुख यांना १४१ रुपये ४९ पैसे मिळाले. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले असताना अशी तुटपुंजी मदत मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Buldhana district hospital : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, स्वच्छतेची बोंब!

दरम्यान, खरीप हंगाम २०२४-२५ मधील नुकसानीसाठी जिल्ह्यातील ६ हजार ६०७ शेतकऱ्यांना एकूण १४ कोटी २४ लाख ११ हजार २३१ रुपये मंजूर झाल्याची घोषणा झाली आहे. विमा रक्कम जमा होताच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे ही मदत मिळाल्याचा दावा केला होता.

Weather updates : सावधान… आजही जोरदार पावसाची शक्यता अलर्ट जारी!

मात्र, शंभर-दोनशे रुपयांच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने नेत्यांचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. शेतकरी आता “हजारोंचे नुकसान झाले, मग विमा कंपनीकडून एवढी थट्टा का?” असा सवाल विचारत असून “नुकसानाच्या प्रमाणात योग्य भरपाई द्यावी” अशी मागणी जोर धरत आहे.