Breaking

Vidarbha State : हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ‘जय विदर्भ’!

Protest to be held in winter session for Vidarbha state demand : विदर्भवाद्यांचा महामेळावा; ऑगस्टमध्ये आंदोलन

Nagpur विदर्भ राज्याच्या मागणीसाठी असंख्य आंदोलने झालीत. नागपुरातील प्रत्येक अधिवेशन या आंदोलनांनी गाजले आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आंदोलनाची धार कमी झाली आहे. ज्या नेत्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलने केली, त्यांनी याकडे आता पाठ फिरवली आहे, अशी टीका सातत्याने करण्यात येते. मात्र, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भवाद्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपुरात ‘जय विदर्भ’चा नारा गुंजणार असल्याचे बोलले जात आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भवादी ‘लाँग मार्च’ काढणार आहेत. त्याचे रूपांतर नागपूरच्या चिटणीस पार्कवरील महामेळाव्यात होणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीची (विराआंस) कोअर कमिटी, जिल्हाप्रमुख, समन्वयक व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आमदार निवासातील उपहारगृहात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तज्ज्ञ सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते.

MLA Sajid Khan Pathan : प्रशिक्षण नको, आता कायमस्वरुपी रोजगार द्या!

९ ऑगस्ट २०२५ रोजी क्रांतीदिनी नागपुरातील संविधान चौकात ‘विदर्भविरोधी व महाराष्ट्रवादी, चले जाव’ या घोषणांसह आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच केंद्र सरकारकडे स्वतंत्र विदर्भ राज्याची तात्काळ निर्मिती करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे १४ लाख हेक्टर जमीन अजूनही पाण्याखाली येऊ शकलेली नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. कुपोषण, प्रदूषण व स्थलांतर यामुळे विदर्भाचे सामाजिक व आर्थिक आरोग्य ढासळले आहे. सध्या ३७ तालुक्यांत नक्षलवादाचे सावट आहे. विदर्भाचे ४ आमदार आणि १ खासदार कमी झाले आहेत. यावरही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित

या बैठकीला अॅड. वामनराव चटप, रंजनाताई मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुणभाऊ केदार, डॉ. पी. आर. राजपूत, सुनीलभाऊ चोखारे, अॅड. सुरेश वानखेडे, डॉ. रमेशकुमार गजबे, तसेच धनंजय धार्मिक, राजेंद्र आगरकर, ज्योतीताई खांडेकर आदी अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.