Sudhir Mungantiwar is an exemplary public servant, says former MP : मुनगंटीवार हे आदर्श लोकप्रतिनिधी, इतरांनी ‘आदर्श’ घ्यावा, माजी खासदाराकडून कौतुकाचा वर्षाव
Chandrapur मंत्रिपद असो वा नसो, आपल्यातील लोकप्रतिनिधी जीवंत ठेवणे, हा सुधीरभाऊंचा सर्वांत मोठा गुण आहे. प्रत्येक पक्षातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या या गुणांचा आदर्श घ्यायला हवा, या शब्दांत माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले. त्याचवेळी ‘सुधीरभाऊ प्राऊड ऑफ यू… वुई लव्ह यू’ अश्या उत्स्फूर्त भावनाही व्यक्त केल्या.
भद्रावती येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि लोकमान्य ज्ञानपीठ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Fake resignation : मागितलेला राजीनामाही खोटा, दिलेलाही खोटा!
ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुधीरभाऊ आहेत. त्यांच्याकडे आलेला कुणीही रिकाम्या हाताने जात नाही. प्रत्येकाचे प्रश्न ते लिहून घेतात. त्यांना पत्र पाठवलेतर त्याचे उत्तर येतेच, शिवाय पत्राचा पाठपुरावा देखील केला जातो. सर्व लोकप्रतिनिधींनी ही बाब शिकण्यासारखी आहे. त्यांना फोन केला आणि ते व्यस्त असतील, तर मोकळे झाल्यावर रिप्लाय नक्की करतात.’
‘या समृद्ध राज्याची अख्खी अर्थव्यवस्था सुधीरभाऊंनी सांभाळली आहे. त्यांना प्रत्येक विभागाची इत्थंभूत माहिती आहे. राजकारणात हे चक्र आहे. ते सतत फिरत राहते. उद्या त्यांच्याकडे काय जबाबदारी येणार, हे कुणालाही माहिती नाही. पण या सर्वांचा विचार न करता आपल्यातील लोकप्रतिनिधी जीवंत त्यांनी जीवंत ठेवला आहे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे आणि तोच त्यांचा सर्वांत मोठा गुण आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी असाच असणे अपेक्षित आहे,’ असंही दर्डा म्हणाले.
चंद्रपूर भाग्यवान आहे
सुधीरभाऊंसारखा नेता लाभणे ही भाग्याची गोष्ट असते. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा भाग्यवान आहे. एवढेच नव्हे तर शेजारी असलेले यवतमाळ, वर्धा आणि नागपूर हे देखील सुधीरभाऊंचा सहवास लाभल्यामुळे भाग्यवान ठरतात, असंही दर्डा म्हणाले.








