Vijay Malokar : मालोकारांचा काँग्रेस प्रवेश अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना रुचला नाही

Entry of Malokar Supporters into Congress Not Welcomed party leaders : मुंबईतील पक्षप्रवेश सोहळ्यात एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता

Akola शिवसेना (शिंदे गट) नेते व तीन वेळा विधानसभा निवडणूक लढविलेले विजय मालोकार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यास अकोला जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असा स्पष्ट आदेश खुद्द प्रदेशाध्यक्षांनी दिला होता. मात्र, या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह अकोला जिल्ह्यातील कोणताही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे मालोकारांचा पक्षप्रवेश अकोल्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रुचला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Local Body Elections : सोशल मीडियावर ‘लेडी पॉवर’चा जलवा, तालुक्यात महिलाराजची चाहूल!

विजय मालोकार हे काँग्रेसमधूनच तीन वेळा निवडणूक लढवून नंतर शिवसेनेत गेले होते. आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने स्थानिक पातळीवरील काही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जाते. विशेषतः अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात विजय मालोकार आणि जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार यांच्यातील राजकीय स्पर्धा सर्वज्ञात आहे.

अमानकार यांनीही याच मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. त्यामुळे आता मालोकारांच्या पुनर्प्रवेशामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nitin Gadkari : साहेब, पेन्शनचे काम झाले हो, ज्येष्ठाने मानले गडकरींचे आभार

विजय मालोकार यांच्यासोबतच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सहसंपर्क प्रमुख आणि हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील तसेच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला होता. मालोकार यांनी शिवसेना, मनसे, भाजप आणि शिंदे गट अशा अनेक पक्षांतून काम केले आहे. १९९९ मध्ये त्यांनी प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर ते अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवसेना सत्तेत असताना त्यांना एसटी महामंडळावर पद मिळाले होते.