Congress criticizes Ajit Pawar’s NCP : जशा गुळाला माश्या लागतात, तसे हे सत्तेला चिकटून बसले आहेत
Nagpur : काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. हे करताना त्यांनी भाजपवर सडकून टिका केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ सत्ता हवी आहे. ते सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत. जसा मासा पाण्याविणा, तशी राष्ट्रवादी सत्तेविणा. भांडतील, लढतील मात्र सत्तेतच राहतील. जशा गुळाला माश्या लागतात, तसे हे सत्तेला चिकटून बसले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (२७ जुलै) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टिका केली. ते म्हणाले, उपराष्ट्रपती धनकड यांनी राजीनामा दिला नाही, तर तो घेतला गेला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे सर्व लोक अचंबित आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी मांडल्या होत्या. त्या कुणाला तरी पटल्या नाहीत. या देशात लोकशाही राहिलेली नाही. सरकारमधील कुणी व्यक्ती भल्यासाठी सरकारच्या विरोधात बोलला, तर त्याला बाहेर काढले जाते. या पक्षात केवळ दोन लोकांनाच सत्ता भोगायची आहे, असे म्हणत नाव न घेता वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
Maharashtra Government : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दीड लाख बेरोजगारांची थट्टा !
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात धनुष्यबाण जिन्ह उद्धव ठाकरे यांना आणि घड्याळ हे चिन्ह आम्हाला मिळू शकतं, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केेले. याबाबत विचारले असता, भाजपने ज्या पक्षांना सोबत घेतले, ते सत्तेत आहेत. भाजपचा आजवरचा इतिहास बघितला तर वापरा आणि फेका, अशीच पद्धत राहिलेली आहे. पुढील काळात त्यांच्या सोबत गेलेल्या लोकांना त्यांच्या ताटाखालचे मांजर बनून राहावे लागेल. रोहित पवार जे बोलले, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्यावा लागेल. निकाल आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.