Declare Wet Drought in Today’s Cabinet Meeting : राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष आजच्या कॅबिनेट बैठकीकडे
Nagpur : महाराष्ट्रात यावर्षी पावसाने हाहाकार उडवला आहे. त्यातल्या त्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, डझनभर मंत्री बांधांवर जाऊन आलेले आहेत. शासकीय मदत देण्याचे आश्वासहनी सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे. याच महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. आज (३० सप्टेंबर) होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे सरकारने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. पुरामुळे राज्यातील ४१ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. खरीप हंगामातील सुमारे ५२ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहेत. खरीप हंगाम तर हातातून निसटला आहेच. पण रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली आहे. त्यामुळेच शेतकरी रब्बी हंगामापासूनही वंचित राहणार आहे.
Change criteria : मदतीचे निकष बदलण्याची मागणी, प्रशासनावर आरोप !
आज (३० सप्टेंबर) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीकडे राज्यातील शेतकरी मोठ्या आशेने त्याच्यासाठी होणाऱ्या निर्णयाची आस लाऊन बसला आहे. सरकारने आतातरी वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी. लोकांची घरे कोसळली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे बाधितांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.
Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभे करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.