व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Change criteria : मदतीचे निकष बदलण्याची मागणी, प्रशासनावर आरोप !

Change criteria : मदतीचे निकष बदलण्याची मागणी, प्रशासनावर आरोप !

Sanjay Raut lashes out at the government in the wake of drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत सरकारवर बरसले

Mumbai : राज्यातील अतिवृष्टी आणि दुष्काळासमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे 6 नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मदतीचे विद्यमान निकष बदलण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

राऊत म्हणाले की, “सरकारने ज्या भागात प्रत्यक्ष पूरस्थिती आहे तिथेच कॅबिनेट बैठक घ्यायला हवी होती. पण मुख्यमंत्र्यांनी तसे न करता दिल्ली गाठली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी अहवाल पाठवा असं सांगितलं, पण अहवाल पाठवला की नाही याची माहितीच नाही. नियम, कायद्याचा बोजवारा उडवत मदत उशिरा मिळते. हे शेतकऱ्यांशी अन्यायकारक आहे.”

Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !

ते पुढे म्हणाले, “आज कॅबिनेटमध्ये मदतीचे निकष बदलणे गरजेचे आहे. हा दुष्काळ आहे… ओला की सुका हा मुद्दा नाही. जेव्हा शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनीसकट वाहून जाते, पुढील तीन-चार वर्षे ते पिक घेऊ शकत नाहीत, ती स्थिती म्हणजे दुष्काळच. अशा वेळी केवळ पाच-दहा हजारांची मदत ही थट्टा आहे. शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यायला हवी.”

Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का

राऊत यांनी बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तातडीने थांबवण्याची मागणी केली. “मुख्यमंत्री आदेश देऊ शकतात, विशेष अधिवेशन बोलावून या विषयावर चर्चा व्हायला हवी,” असं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी देखील मराठवाडा दौऱ्यात याच मागण्या केल्याचं त्यांनी आठवण करून दिलं.

Where is mosque : हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का?

आहिल्यानगरमधील तणावावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “पूरस्थितीवरील सरकारच्या अपयशाकडे लक्ष न जाता मुद्दाम तणाव निर्माण केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या काही उपकंपन्या अशा गोष्टी घडवतात. बाडग्यांसारखी मंडळी हे तणाव वाढवत आहेत. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.”

_____

error: Content is protected !!