Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार..!

Fadnavis’s Words Won’t Change Reality OBCs Will Take the Hit : जातनिहाय जनगणना करून सर्वांना त्यांच्या प्रमाणे आरक्षण द्यावे

Nagpur : मराठा समाजाला काय द्यायचे, ते सरकारने द्यावे. त्याला आमचा विरोध नाही. नव्या जीआरमुळे सर्व भागातील मराठा समाज ओबीसीत येणार आहे. हे आम्हाला मान्य नाही. राहुल गांधी यांनी जी भूमिका मांडली होती की, आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर नेऊन जात निहाय जनगणना करून सर्वांना त्यांच्याप्रमाणे आरक्षण द्यावे, याच प्रमाणे सरकारने कृती करावी, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची भूमिका आता पूर्वीसारखी दिसत नाही. ते कुठल्या चष्म्यातून बघतात, ते त्यांना माहिती नाही. त्यांची भूमिका स्पष्ट नाही. आगामी दिवसांत सत्य परिस्थिती सर्वांच्याच लक्षात येईल. छगन भुजबळ यांच्या मताशी आम्ही सहमत आहो. ओबीसींचे नुकसान होत आहे, हे त्यांना वाटते. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेचे समर्थन करतो.

Reservation controversy : पवार गटाचे माजीमंत्री देशमुखांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध !

हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे, आम्ही आमचे म्हणणे मांडू. जर आमचे समाधान झाले तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सांगू. पण सध्या जे काही चाललंय, ते दोन्ही समाजांना खेळवण्याचा प्रकार आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये लू लाख कुणबी कोण आहे, हे कसे शोधावे. कुठेही नावाचा उल्लेख नसल्याने हा सरसकट जीआर आहे. पात्र शब्द यातून वगळला आहे. त्यामुळे या जीआरला आमचा विरोध आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.