Group that does not accept Amit Shah in the Mahayuti said Vijay Wadettiwar : काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
Nagpur : भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बेबनाव आहे, हे काही लपून राहिलेले नाही. याशिवाय भाजपमध्येही गटबाजी आहे, अमित शाह यांना न मानणारा एक गट भाजपमध्ये आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील यांच्या इतर पक्षांच्या नेत्यांशी भेटींबाबत विचारले असता, केवळ भेटले म्हणून राजकीय चर्चा का केली जाते? विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना भेटू नये, असा काही नियम आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मी पण मुख्यमंत्र्यांना भेटलो. अनेकांना भेटत असतो, तर लगेच त्याचे तर्क-कुतर्क काढणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जवळचे लोक टार्गेट करत आहेत !
संजय राऊत यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, राऊत म्हणतात ते खरं आहे. त्यांचे संस्थान आहे, साखर कारखान्यावर आधार पोहोचले जातात. त्याचे काही प्रश्न असू शकतात. सोयीचे बोलणे योग्य नाही. प्रशांत कोरटकरच्या बाबतीत विचारले
असता, पोलिसांकडून तुरी घेणारा त्यांनाच तुरी देऊन कसा पळाला? पोलिसांनी त्याला पळवले का, असा प्रश्न पडतो. त्यानं महाराजांचा अवमान केला. त्याला सोडता कामा नये. स्वातंत्र्यवीर सावकरकर यांनी महाराजांचा अवमान केला. यावर जो काही वाद असेल, त्यावर साहित्यिकांनी भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.
Vijay Wadettiwar : सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूप्रकरणी सरकारची पोलखोल !
कोरटकर नागपूरचा आहे. तो मुख्यमंत्र्यांना नेहमी भेटतो. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनादेखील भेटतो. त्यामुळे कदाचित नागपूर पोलीस घाबरले असतील, मोतेवारची जप्त केलेली कार तो चालवतो. यावरून त्याचे लागेबांधे काय आहेत, हे लक्षात येते. उद्या तो पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीत फिरताना दिसला तरी नवल वाटायला नको, असा टोला वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.