Breaking

Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

Investigate the decisions taken by Dhananjay Munde : पीक विमा योजनेतून
भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न

Nagpur राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रहार केला आहे. मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या पीक विमा योजनेची व त्याबाबतच्या निर्णयांची चौकशी करण्यात यावी. त्यांनी राज्यात भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्नच राबविला असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती. त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता. पण या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समजते. विशेषत: या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.

 

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांसाठी पुन्हा सोडला गुंडावारांनी ‘तोच’ संकल्प !

खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले. त्यातील एक लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळले आहेत, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका काँग्रेस वडेट्टीवार यांनी केली. कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्याचे खरेदीचे धोरण बदलले होते. त्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mahayuti Government: मोठी बातमी! एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार?

 

 

तसेच बारामती येथील उस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोपदेखील वाल्मीक कराडवर झाला आहे. कराड मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.