Vijay Wadettiwar : ‘विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘कुछ तो गडबड है..’ 

Vijay Wadettiwar said, ‘Something is Going wrong : सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहेत, हे बावनकुळेंनी तपासावं

Nagpur : धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट चार तास झाली, की चार मिनिटं झाली, हे माहिती नाही. पण भेट झाली हे खर आहे. डोळ्याचं ऑपरेशन हे नॉर्मल असतं. त्यामध्ये काही सिरीयस होते का, हे बघावं लागेल. त्यावेळेस मुंडे यांना भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले नाही. धस कशाला भेटायला गेले? ‘कुछ तो गडबड है..’, असे म्हणत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्या भेटीवर शंका उपस्थित केली.

आज (१९ फेब्रुवारी) नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील. त्यावर संशय निर्माण होत आहे. ते सुरेश धस स्वतःच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासंदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहेत, ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोधून काढलं पाहिजे.

Shivaji Maharaj Jayanti : ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेने दुमदुमली वर्धा नगरी

मुख्यमंत्र्यांच्या तंबीबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांचं काही चुकलं नाही. गोपनीयतेची शपथ घेतली जात असेल तर ती पाळली पाहिजे. सरकारच्या गोष्टी बाहेर जाऊ नये. चॅनलला हेडलाईन दाखवण्यासाठी तुम्ही सोर्स वापरता, त्याला एखादा कॅबिनेट मंत्री बळी पडतो. प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. मंत्रिमंडळात कुणी फितूर आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी त्या फितुराचा शोध घ्यावा. त्यासाठी विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना मदत करू. ते मागणी करतील तर आम्ही त्यांना नाव देऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : महाराजांचा चुकीचा इतिहास लिहीणारे आरएसएसचे फॉलोअर !

डान्सबार संदर्भात जी माहिती होती ती आम्हाला मीडियातून मिळाली. आम्ही आमची बाजू मांडत असतो. डान्सबार संदर्भात काय नियम आणि अटी होत्या, त्या असल्याच पाहिजे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील काय विषय आहे, हे त्यांचं ते बघतील. पण त्यावेळेस एकनाथ शिंदेंचं वक्तव्य महत्त्वाच आहे. ठाकरेंसोबत असताना महायुतीसाठी पक्ष संपवू शकत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं होतं. काळानुरूप भाषा बदललेली आहे. स्वतःला त्यातून आनंद मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले जात आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.