व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay wadettiwar: फक्त पाहणीत वेळ घालवू नका, थेट बँक खात्यात मदत जमा...

Vijay wadettiwar: फक्त पाहणीत वेळ घालवू नका, थेट बँक खात्यात मदत जमा करा; वडेट्टीवारांचा सरकारला टोला

Vijay Wadettiwar urges the government to deposit financial assistance into farmers’ accounts at the earliest without wasting time on inspections : हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत आणि सर्व प्रकारची कर्जे माफ करण्याची मागणी

Nagpur राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. अशा वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केवळ पाहणी दौरे करून वेळ दवडू नये, तर शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मागील वर्षी राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी २५३ तालुके आणि सुमारे ६८.७ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र घोषित मदतीपैकी प्रत्यक्षात अर्धीच रक्कम खर्च केली. सरकार घोषणा मोठ्या करते, पण प्रत्यक्षात शेतकरी मदतीपासून वंचित राहतो, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. दुष्काळामुळे पीकच हातात येणार नसेल तर शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार? असा सवाल करत शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी आणि सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Chandrashekhar bawankule: सिमेंट रस्ते, गटारे सोडा, आधी जलसंधारणाची कामे करा

सरकारने पीक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि सत्ताधारी-विरोधकांना विश्वासात घेऊन मदतीचे पॅकेज निश्चित करावे, असे सांगत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या तिजोरीतील पैसा आधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करण्यासाठी वापरला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

केंद्र सरकार गुजरातला भरभरून मदत करते, मात्र महाराष्ट्राने मागणी केल्यावर अपेक्षित मदत मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांना मदत देण्यात विलंब झाल्यास पाणी, जनावरांचा चारा आणि टँकरची समस्या आणखी तीव्र होऊ शकते, त्यामुळे सरकारने केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!